मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू दिल्लीत, पंतप्रधान मोदींची घेतली भेट

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू सध्या भारत दौऱ्यावर आले

आहेत. यादरम्यान, मुइज्जू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची

भेट घेतली. हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, पीएम

Related News

मोदी आणि मुइज्जू यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय

विमानतळाच्या धावपट्टीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले.

यावेळी मालदीवमध्ये रुपे कार्डद्वारे पेमेंटही सुरू करण्यात आले.

मोदी आणि मुइज्जू यांनी पहिला व्यवहार केला.

बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये संयुक्त निवेदन

जारी केले. पीएम मोदी म्हणाले की, “भारत आणि मालदीवमधील

संबंध शतकानुशतके जुने आहेत. भारत मालदीवचा सर्वात

जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट

पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे.

आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर

तपशीलवार चर्चा केली. एकता हार्बर प्रकल्पावर वेगाने काम सुरू

आहे. आम्ही हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी

एकत्र काम करू.” मालदीवमध्ये सुरू असलेल्या भारतीय

प्रकल्पांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, “आज आम्ही परस्पर

सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक

आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन स्वीकारला आहे. विकास

हा आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आम्ही

नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.

मालदीवच्या आवश्यकतेनुसार आज 400 मिलियन अमेरिकन

डॉलर्सच्या चलन स्वॅप करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

भारत आणि मालदीव मुक्त व्यापार करारावरदेखील चर्चा सुरू

आहेत. आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी

तयार आहोत. आज भारताच्या सहकार्याने बांधलेल्या 700 हून

अधिक सामाजिक गृहनिर्माण युनिट्स सुपूर्द करण्यात आल्या

आहेत.” भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचे आवाहन

करताना ते म्हणाले की, “शेजारी आणि मित्रांचा आदर हे

मालदीवसाठी भारतीयांचे सकारात्मक योगदान आहे. भारतीय

नेहमीच मालदीवमध्ये सकारात्मक योगदान देतात, भारतीय

पर्यटकांचे आमच्या देशात स्वागत आहे. मालदीव आणि भारत

यांच्यातील संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत आणि मला

विश्वास आहे की या भेटीमुळे ते आणखी मजबूत होतील.”

Read also: https://ajinkyabharat.com/victor-ambrose-and-gary-ruvkun-receive-nobel-prize-in-medicine/

Related News