देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. नवरात्री नंतर दसरा,
दिवाळी आणि धनत्रयोदशी असे मोठे सण अवघ्या दिवसांवर येऊन
ठेपले आहे. या काळात लोक मोठ्याप्रमाणात सोनं- चांदी खरेदी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
करतात, पण या सणासुदीच्या काळाला सुरुवात होत नाही तोवर
सोन्या- चांदीच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडल्याचे पाहायला मिळत
आहे. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आज ७६ हजारांवर
जाऊन पोहोचला आहे. तर प्रति किलो चांदी ९३ हजार झाली आहे.
यामुळे आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं-चांदी खरेदी करावं की
नाही असा प्रश्न पडला आहे. आज ५ ऑक्टोबर रोजी देशात सलग
दुसऱ्या दिवशी सोने चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. मात्र
हे दर स्थिर असले तरी यात झालेली वाढ ही खूप मोठी आहे,
देशात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७६,२५० रुपये आहे, तर
१ किलो चांदीचा दर ९३,५७० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा
विचार केल्यास सोन्याच्या दरात सतत १००० ते २००० रुपयांच्या
दरम्यान चढ-उतार दिसून येत आहे, तर चांदीच्या दरातही
सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणं आता
सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. बुलियन मार्केट
या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७६,
२५० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६९, ८९६ रुपये आहे. याशिवाय
१० ग्रॅम चांदीचे दर ९३६ रुपये आहे तर १ किलो चांदी ९३,५७०
रुपयांनी विकली जात आहे. आदल्या दिवशीचा म्हणजे ४ सप्टेंबर
२०२४ रोजी देखील हेच दर होते. सोनेखरेदी करताना सराफाकडून
असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे
आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे
आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं
आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली
आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत
माहिती देत आहोत. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२
कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त
यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले
जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत
नाहीत.
Read also: https://ajinkyabharat.com/incriminating-legislation-about-prophet-mohammed/