कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव वाढल्याने शाकाहार महागला!

सामान्यतः मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारापेक्षा दुप्पट असते,

मात्र सरलेल्या सप्टेंबर महिन्यात विपरीत चित्र दिसून आले. कांदे,

बटाटे व टोमॅटोच्या किमती कडाडल्यामुळे घरगुती बनवलेल्या

Related News

चिकन थाळीपेक्षा अधिक, शाकाहारी थाळीची सरासरी किंमत ११

टक्क्यांनी वाढली. ब्रॉयलर चिकनच्या किमतीतील घटीने यात

हातभार लावला. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या ‘क्रिसिल मार्केट

इंटेलिजन्स’च्या अहवालाने शाकाहार महागण्यामागील कारणांचा

वेध घेतला आहे. कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाल्यामुळे

सप्टेंबरमध्ये या जिनसांसह, टोमॅटोच्या किमती अनुक्रमे ५३ टक्के,

५० टक्के आणि १८ टक्क्यांनी वाढल्या. मुसळधार पावसामुळे

आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम

झाला आहे. वार्षिक तुलनेत नव्हे, तर आधीच्या महिन्याच्या

तुलनेतही भाज्यांची दरवाढ ही एकंदर किंमतवाढीस कारणीभूत

ठरली आहे. शाकाहारी थाळीची किंमत सप्टेंबर २०२३ मधील २८.१

रुपयांवरून यंदाच्या सप्टेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढून ३१.३

रुपयांवर गेली आणि आधीच्या ऑगस्टमध्ये ती ३१.२ रुपये होती.

थाळीच्या किमतीत ३७ टक्के वाटा असलेल्या भाज्यांच्या किमती

वाढल्याने एकंदरीत शाकाहारी थाळी महागली आहे. बरोबरीने

डाळींचे उत्पादन घटल्यामुळे त्यांच्या किमतीही वार्षिक तुलनेत १४

टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/haryanat-61-voting/

Related News