10 ऑक्टोबरला सत्यपाल महाराज महान नगरीत       

महान: सप्त खंजेरी वादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे महान येथे 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 8 वाजता शुभम जाणुनकर यांचे शेतात जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सरपंच तथा खरेदी विक्री संचालक सुनील ढाकोलकर यांनी महान आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.