काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक

गोवंडी पोलिसांची कारवाई

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अपघातांमध्ये सातत्याने

वाढ होत आहे. त्यातच आता एक मोठी घटना समोर आली आहे.

Related News

काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा मुलगा गणेश हांडोरे याला

पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडी पोलीस स्थानकात

त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता

मुंबईतील गोवंडी पोलिसांनी गणेश हांडोरेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हांडोरे हे ज्यूस पिण्यासाठी

गोवंडीत गेले होते. गोवंडीहून पुन्हा परतत असतानाच त्यांनी

चेंबूरमधील आचार्य कॉलेजजवळ एका दुचाकीला धडक दिली. या

धडकेत दुचाकीस्वार गोपाळ आरोटे याला दुखापत झाली. यानंतर

गोपाळ आरोटेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करताच

गणेश हांडोरेने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर गोपाळ

यांची शुगर वाढली. त्यांना जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात

आलं आहे. शुक्रवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान हा अपघात

घडला. यानंतर गोवंडी पोलीस ठाण्यात गणेश हांडोरेविरोधात

तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर गोवंडी पोलिसांनी

त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आता गणेश हांडोरे

याला पोलिसांनी अटक केली आहे. तर गणेश हांडोरे यांच्या

कारच्या धडकेत जखमी झालेले गोपाळ आरोटे यांच्यावर

रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या याप्रकरणी गोवंडी पोलीस

पुढील तपास करत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/take-care-of-yourself-in-the-october-heat/

Related News