फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना जगातील दुसऱ्या
क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावण्यात यश आले
आहे. त्यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
Related News
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
जेफ बेझोस यांना मागे टाकून, त्यांनी हे स्थान मिळवले आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत यावर्षी प्रचंड
वाढ झाली आहे. अलीकडेच त्यांनी प्रथमच 200 अब्ज डॉलर्स
संपत्तीचा पल्ला गाठला आहे. आता त्यांनी आणखी एक विक्रम
रचला असून, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा
किताब पटकावण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांची एकूण
संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जेफ बेझोस यांना
मागे टाकून, त्यांनी हे स्थान मिळवले आहे. आता केवळ टेस्लाचे
मालक एलॉन मस्क हे त्यांच्या पुढे आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स
इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार, एलॉन मस्क यांची एकूण
संपत्ती सध्या 256 अब्ज डॉलर इतकी आहे. मार्क झुकेरबर्ग 206
अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आणि ॲमेझॉनचे माजी सीईओ
जेफ बेझोस 205 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत.
आता मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क यांच्यात केवळ ५० अब्ज
डॉलर्सचे अंतर उरले आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गसाठी 2024
हे वर्ष खूप चांगले आहे. त्यांच्या संपत्तीत आतापर्यंत ७८ अब्ज
डॉलरची वाढ झाली आहे. याशिवाय तो श्रीमंतांच्या यादीत 4
स्थानांनी वर पोहोचला आहे. मेटा प्लॅटफॉर्म्समध्ये मार्क झुकरबर्ग
यांची सुमारे 13 टक्के भागीदारी आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि
इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत
येतात. यावर्षी त्यांनी जगातील 500 श्रीमंत लोकांमध्ये सर्वाधिक
पैसे कमावले आहेत. विशेष म्हणजे मेटा प्लॅटफॉर्मचे शेअर्स यावर्षी
जवळपास 70 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीने आर्टिफिशियल
इंटेलिजन्स (एआय) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे
कंपनीचा शेअर चांगली कामगिरी करत आहे. कंपनीच्या
शेअर्समध्ये झालेल्या या प्रचंड वाढीमुळे, मार्क झुकेरबर्गच्या
संपत्तीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/chandrapur-babupeth-udaanpulala-dr-babasahebbanche-boat/