अकोला दि 4 प्रतिनिधी : सार्थक वक्तृत्व अकॅडमी व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय खुल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेत संभाजीनगर येथील स्वप्नील खरात याने प्रथम पारितोषिक पटकावून ‘प्रोफेसर डॉ.एम.आर.इंगळे राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक २०२४’ हा बहुमान प्राप्त केला. स्पर्धेचे आयोजन रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी सम्यक संबोधी सभागृह रणपिसे नगर अकोला येथे केले होते.
संभाजीनगर येथील स्वप्नील खरात याने प्रथम क्रमांक तर व्दितीय रितेश तिवारी,नागपूर, तृतीय श्रुती तायडे, बुलढाणा, चतुर्थ किशन जाधव,परभणी, पंचम अमोल आव्हाड,नाशिक
तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक बुशरा सोरढीया,अकोला, द्वितीय शुभम झाडे,अमरावती, तृतीय तृप्ती भेंडकर, अकोला, चतुर्थ गणेश राऊत, अकोला, पंचम सौरभ गुडदे, अमरावती यांनी पटकाविले.
प्रथम बक्षिसाचे स्वरूप १०,००० रोख, आकर्षक करंडक, डॅा एम आर इंगळे लिखीत भारतीय संविधान: मानवी हक्कांची सनद हा ग्रंथ व प्रमाणपत्र असे होते तर व्दितीय ८,०००रोख, तृतीय ६००० रोख, चतुर्थ ४००० रोख, पंचम २००० आणि एकूण पाच प्रोत्साहनपर बक्षीसे प्रती १०००/- रोख प्रदान करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणुन मा.पैगंबर शेख,पुणे, डॉ.स्वप्ना लांडे,अकोला, सिध्देश सावंत, मुंबई यांनी जबाबदारी पार पाडली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मधु जाधव, ज्येष्ठ नाट्यकर्मी तथा पत्रकार अकोला, प्रमुख अतिथी म्हणुन डॅा.आर.एम.भिसे, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला, प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा, प्रमुख उपस्थिती म्हणुन मा. विजय पोहनकर, सिने दिग्दर्शक मुंबई, मा. तिक्ष्णगत वाघमारे, युवा उद्योजक, अकोला हे होते तर विचारमंचावर प्रोफेसर डॅा एम आर इंगळे, डॅा सौ. संगीता इंगळे उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला त्यामध्ये डॅा. उमेश घोडेस्वार, कु. स्वप्ना काशीद, अजय कोसमकार, शुभम गोळे, अविका जामनिक यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्पर्धेची पार्श्वभूमी प्रा राहुल माहुरे यांनी मांडली. स्पर्धक म्हणुन स्पर्धेच्या आयोजना संदर्भात शुभम झाडे, तृप्ती भेंडकर यांनी आपली मते मांडली.
याप्रसंगी प्रा. संजय खडसे, डॅा रामेश्वर भिसे, विजय पोहनकर यांनी स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्रा मधु जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी हागोणे तर आभार प्रदर्शन विशाल नंदागवळी यांनी केले.