अकोला : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण अकोला शहरात येऊन गेले.
अकोला पश्चिम चे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यानंतर भाजप तर्फे कोणाला तिकीट देण्यात येते याची अनेकांना उत्सुकता आहे.
अचानक अजित चव्हाण यांचा दौरा झाल्याने अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी आले होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
यंदा भारतीय जनता पार्टीतर्फे विधानसभेच्या निवडणुकीत विविध मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अकोला दौऱ्यावर असतांना त्यांनी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थितांशी त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला.राज्य विधानसभा निवडणुका तोंडावर असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सर्वच राजकिय पक्षातील मोठ्या नेत्यांचे दौरे राज्यभरात सुरू आहेत.सर्वच क्षेत्रातील मतदारांशी यामाध्यमातून संवाद साधण्यात येत आहे.
दरम्यान आजच्या भेटीत चव्हाण यांना किरण पाटील यांनी आपला कार्य अहवाल सादर केला.
यावेळी प्रा.अंधारे, योगेश सरोदे, निखिल सहारकर, मनीष कोकाटे, प्रतीक कराळे, प्रसाद देशमुख, सोमू शेलकर, भूषण बोन्द्रे, शंकर शिंदे, सतीश भोसले, राहुल नागरे, मनीष भोसले, विठ्ठल काळदाते, सागर गायकवाड, ओम काळे, पार्थ वानखडे, मयूर धारस्कार, अमर ठाकरे, समीर धोत्रे, संकेत काळे, दिनेश काटे, मधुर अवताडे, शिवनेरी अवताडे, डॉ. ऋषिकेश अंधारे, राजू मुंगीकर आदी उपस्थित होते.