नवरात्रोत्सवात भाविकांसाठी विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रा!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्या

वतीने नवरात्र उत्सवादरम्यान भाविक भक्तांसाठी ‘विशेष

नवरात्र देवी दर्शन यात्रा’ सुरू केली आहे.

Related News

सदर यात्रा दिनांक ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत

असणार आहे. या यात्रेत भक्तांना बाळापूर बाळादेवी, पातूर

रेणुकादेवी, चिंचोली रुद्रायणीदेवी, बार्शीटाकळी कालंका माता,

दोनद आसरा माता आणि काटेपूर्णा ढगादेवी या देवींचे दर्शन

करता येणार आहे. या विशेष नवरात्र देवीदर्शन यात्रेचे पूर्णप्रवास

भाडे २६५ रुपये तर महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे

प्रवास भाडे १३० रुपये असणार आहे. तर दुसऱ्या यात्रेत

मुऱ्हादेवी, अमरावती अंबादेवी, कटेपूर्णा ढगा देवी या देवींचे

दर्शन करता येणार आहे. या नवरात्र विशेष देवीदर्शन यात्रेचे

पूर्णप्रवास भाडे ३७० रुपये तथा महिला, ज्येष्ठ नागरिक व

लहान मुलांचे प्रवासी भाडे १८५ रुपये असणार आहे.

या यात्रा बसेस जुने बसस्थानक अकोला आगार क्र. १ येथून

सकाळी ८:३० वाजता सुटतील तर भक्तांची गैरसोय टाळण्या

साठी अकोला आगार क्रमांक १ येथून सकाळी १० ते सायंकाळी

५ या वेळेत तिकीट आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात

आली असल्याची माहिती बस स्थानक प्रमुख तथा आगार

प्रमुखांनी दिली.

Read also: https://ajinkyabharat.com/major-changes-in-transport-in-thane-due-to-prime-minister-modis-visit/

Related News