गुणरत्न सदावर्ते आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरें

विरोधात शड्डू ठोकलाय. वरळी विधानसभा मतदारसंघातून

निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली

Related News

आहे. शिवाय महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून

उमेदवारी मिळण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी

केली. वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली

होती. या निवडणुकीत 89248 मतं मिळवत आदित्य ठाकरेंनी

मोठा विजय मिळवला होता. दरम्यान विधानसभा निवडणूक

जिंकल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे

मंत्री देखील झाले होते. त्यामुळे आता वरळी विधानसभा

मतदारसंघातून आदित्या ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार

असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महायुतीकडून

वकील गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/arun-gawalichi-mulgi-thackeray-gatchaya-contact/

Related News