प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर!

केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास

आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केलं आहे. प्रकाश

आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व

Related News

सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन

आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे,

आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आवाहन रामदास

आठवले यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले

आहे. आता रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश

आंबेडकर नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले

आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला

8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी

केली आहे. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून

येतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. राज्यात

महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका,

असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे. मी ज्यांच्या

सोबत असतो त्यांचे सरकार येते, अशी मिश्किल टिप्पणी देखील

रामदास आठवले यांनी केली आहे.तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

यांनी समान नागरी कायदा आणणार असं वक्तव्य केलं आहे. त्या

बाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी

कायदा आला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sadhgurus-isha-foundation-consoled-by-the-supreme-court/

Related News