अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करा! शेतकऱ्यांचे आंदोलन

२०२४ च्या जून , जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अकोला

जिल्हासह बाळापुर आणि तेल्हारा तालुक्यात संततधार पाऊस

झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांसह अन्य पिकांच मोठ्या

Related News

प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत अद्यापही

मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तर बाळापुर

तालुक्यातील जोगलखेड येथे गोपाल पोहरे या शेतकऱ्याने अकोला

जिल्ह्यात तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा, शेतकऱ्यांना

कुठलेही नियम निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्यात

यावी, १००% पिक विम्याचा तत्काळ लाभ कुठलेही नियम निकष

न लावता देण्यात यावा तसेच २०२० मध्ये मंजूर झालेला खरीप

हंगामाचा बाळापूर तालुक्यातील १८ हजार शेतकऱ्यांचा पिक विमा

तात्काळ देण्यात यावा, मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पिक विमा

कंपनीला देण्यास बाध्य करावे या प्रमुख मागण्यांसाठी समाधी

आंदोलन पुकारलं. आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्वतःला जमिनीत

गाडून घेत घोषणाबाजी केली. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित

होते.

Read also: https://ajinkyabharat.com/the-houses-of-recognized-encroachment-holders-are-bulldozed/

Related News