नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

‘वर्षा’वर खलबतं सुरु!

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या

काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत

Related News

आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध

महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध

बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची

बैठक सुरु आहे. गेल्या तासाभरापासून नारायण राणे आणि

एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत

आहे. महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी

भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपला लोकसभा

निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे

आता येणारी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी जास्त

प्रतिष्ठेची बनली आहे. येत्या निवडणुकीत काहीही करुन आपलं

महायुतीचं सरकार यावं, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न

केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे

सातत्याने महाराष्ट्र दौरे करत आहेत. त्यातच कालपासून दोन

दिवस अमित शाह हे मुंबईत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे,

नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद

साधला. या मेळाव्याला नारायण राणेंनीही हजेरी लावली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/accidents-on-samriddhi-highway-reduced/

Related News