पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २०० पेक्षा
जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र
मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या
भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली
असून जीवितास धोका वाढला आहे. नेपाळमध्ये संततधार
पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान २०० लोकांचा
मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. दरम्यान आता भारतीय
दूतावासाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
नेपाळमध्ये महापूरात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी
भारताच्या दूतावासाने काही सूचना जारी केल्या आहेत. तसेच एक
हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकारी पूर
आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात
आहेत. तसेच दूतावास त्यांच्या सुरक्षित परतीसाठी व्यवस्था करत
आहे. नेपाळमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट केले,
“नेपाळमध्ये विक्रमी पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठे
नुकसान झाले आहे. आमचे विचार प्रभावित झालेल्या सर्वांसोबत
आहेत. दूतावासाला काही अडकलेल्या नागरिकांची माहिती
मिळाली आहे. दूतावास यापैकी काही गटांच्या संपर्कात आहे
आणि त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करत आहे. अडकलेल्या
भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दूतावास नेपाळी
अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.” नेपाळमधील भारतीय
दूतावासाने मदतीसाठी इच्छुक लोकांसाठी आपत्कालीन क्रमांकही
जारी केले आहेत. नेपाळमध्ये राहणारे भारतीय नागरिक ज्यांना
मदतीची गरज आहे ते खालील आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क
साधू शकतात ( सह): +९७७-९८५१ ३१६८०७ आपत्कालीन
हेल्पलाइन +९७७-९८५११ १७०२१, +९७७- ९७४९ ३३ २९२.