केंद्राकडून पूरग्रस्त राज्यांना पुनर्वसनासाठी 5,858 कोटी रुपये मदत

केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी,

आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655

कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी

Related News

80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी

वितरीत करण्यात आला आहे. पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी

गृह मंत्रालयाने काल जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492

कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य

मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले

आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर

आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून

आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत काल जाहीर करण्यात आली

आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे

काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय

आला. गृहमंत्री श्री. शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी

1492 कोटींचे पॅकेज जाहीर केले. पीएम मोदी शेतकऱ्यांचा

उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या

काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही

संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे

दाखवून दिले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-bjp-envelope-pattern-for-candidate-selection/

Related News