आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी
भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत
राबविलेला ‘लिफाफा’ पॅटर्न राबविला जात आहे. वेगवेगळ्या
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी,
याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने मंगळवारी संभाजीनगरमधील
पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद
लिफाफ्यात उमेदवारांची नावे मागवून घेतली. यावेळी
पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद
पाकिटातून सोपविली.
उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचे
बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गोवा आणि बिहारच्या
निवडणुकीत देखील भाजपकडून लिफाफा पॅटर्न राबवण्यात आला
होता. त्यामुळे आता भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी
ठरणार, हे बघावे लागेल. आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक
जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यमान
आमदारांना डच्चू दिला जाईल. तसे घडल्यास भाजप पक्षसंघटनेत
याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी
महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.
यावेळी एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका होणार
आहेत. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चाळीसहून अधिक निर्णय
घेतले होते. याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठ्याप्रमाणावर निर्णय
होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-5-october-rosie-maharashtra-dauriyavar/