अकोला – राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप कोतवाल संघटनेकडून करण्यात आला आहे.
3 वर्षांनंतर केवळ 10 टक्के वाढ करण्यात आल्याचा आरोप करीत निषेध नोंदवण्यात आला आहे.
तर इंग्रज कालीन कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.