महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मुक्काम अजुन किती दिवस?

महाराष्ट्रात यंदा मान्सूनची दमदार हजेरी लागली असून जून ते

सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126% पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात झाल्याचे

Related News

सांगण्यात आले आहे. मागील वर्षी सरासरीहून कमी पाऊस

झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी

ताटकळावे लागले. पण यंदा पावसाने मागील वर्षीची कसर भरून

काढली आहे. राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान 994.5 मी

पावसाची नोंद होत असते मात्र, यंदा प्रत्यक्षात 1,252.1 मीमी

पाऊस बरसला आहे. राज्यात यंदा मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक

पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या

पावसाने तर पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांची मोठी

तारांबळ उडाली होती. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 139%

अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात

साधारण 747.4 मी पाऊस कोसळतो. यंदा मात्र यात अधिकची

भर पडली आहे. मध्य महाराष्ट्रात यंदा 1335.8 मीमी पाऊस

पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश

या भागातून सध्या मान्सून एक्झिट घेत आहे. पुढील दोन ते तीन

दिवसात या भागातून मान्सून माघारी फिरेल. दरम्यान पाच

ऑक्टोबरनंतर उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढवून

त्यानंतर मान्सून माघारी फिरेल असा अंदाज देण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-5-october-rosie-maharashtra-dauriyavar/

Related News