दसऱ्याच्यादिवशी मेळावा घेण्याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे.
त्यात शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा असो की
भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा मेळावा असो यात आता
Related News
चारधाम यात्रा करणार सोपी
तामिळनाडूतील मच्छिमारांवर श्रीलंकन लुटारूंचा हल्ला
पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या पित्याचे राक्षसी रूप
श्री लैराई देवीच्या यात्रेत भीषण चेंगराचेंगरी
अंतराळात आनंदाचा क्षण!
अकोला: जुना शहर पोळा चौकात युवकावर जीवघेणा हल्ला
अकोला: नवीन उड्डाणपुलावर दुचाकी अपघात
झांसी: डीजे वाजवल्याच्या वादातून गोंधळ
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्समधून ‘या’ 5 खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता?;
“भारत युद्ध करेल” भीतीने थरथरलेला पाकिस्तान!
आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे. ती म्हणजे यावर्षीपासून
नारायण गडावर ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये
दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे
नारायणगडावरून रणशिंग फुंकले असून जरांगेंनी या बैठकीत तशी
घोषणा केली. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज
नारायणगडावर पार पडली. या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची
मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा
मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था
असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा
गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.
नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक
आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे
आयोजन करण्यात होते. या बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय
घेतला आहे. आठवडाभर उपोषण करुनही सरकारने आमच्या
मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई
निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले होते.
त्यानंतर आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा
मेळाव्याची घोषणा झाल्यानं विधानसभा निवडणूसाठी मनोज
जरांगे यांनी रणशिंग फुंकल्याचं दिसतंय.
Read also: https://ajinkyabharat.com/symptoms-of-recession-in-chinas-economy/