मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न

महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा

प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे

Related News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एका अज्ञात

महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला.

तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या

कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून

दिल्याची माहिती आहे. मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु

होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी निघण्याची लगबग सुरु

होती. त्यावेळी हा प्रकार घडला. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं

कार्यालय आहे. एक अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या

कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर

कार्यालयात घुसून आरडाओरडा केला. तिथे असलेल्या कुंड्या

फेकल्या. गोंधळ घातला. त्यानंतर तिथून पसार झाली.

ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी

पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच

कार्यालयच सुरक्षित नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. या महिलेचा

आता शोध सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या

कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार

आहेत. देवेंद्र फडणवीस हे सध्या निवडणुकीच्या तयारीमध्ये,

राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. मंत्रालयात त्यांच्या

कार्यालयात हा प्रकार घडला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे

उपस्थित होते की नाही? हे समजू शकलेलं नाही.

Related News