मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्र
न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
सुनावण्यात आली. त्यानंतर लगोलग संजय राऊत यांच्याकडून
अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. आता या प्रकरणात
संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व
जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय
राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 30 दिवसांच्या आत वरच्या
कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात
आली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात
154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. त्यापैकी 16
शौचालयं बांधण्याचं कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या
पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट
कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका
अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी
केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी झाली. यात संजय राऊतांना
15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मेधा सोमय्या यांनी
त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टात आव्हान दिलं
होतं. या खटल्याचा निकाल सोमय्या यांच्या बाजूने लागला. संजय
राऊत यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. आता त्यांचा जामीनही
मंजूर झाला आहे.