आज शाळा बंद! राज्यातील शिक्षकांचे सामूहिक रजा आंदलोन

राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज (25 सप्टेंबर) एक दिवसाचे

लाक्षणीक आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील

जवळपास सर्व शिक्षक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे सुमारे

Related News

40 हजार शाळा बंद आहेत. ज्याचा जवळपास पावणेदोन लाख

मुलांवर परिणाम होईल. एक दोन नव्हे तर तब्बल 22 शिक्षक

संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमध्ये शिक्षकांची

मान्यता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसंबंधीच्या राज्य

सरकारच्या धोरणांना लक्ष्य करण्यात आले. यासोबतच शाळांमध्ये

पोषण आहार योजना अंमलबजावणी, जसे की, खीचडी

बनविण्यासारखे अशैक्षणिक काम थांबवावे या मागण्यांकडे हे

शिक्षक लक्ष वेधत आहेत. राज्यभरात आज शाळा बंद असतानाच,

नव्याने मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची नुकतीच झालेली

भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शिक्षकांनी विविध

ठिकाणी जमून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.

सुमारे 100,000 शिक्षकांनी काम थांबवण्यात भाग घेतला आणि

शैक्षणिक समस्या हाताळण्याबाबत सरकारबद्दल नाराजी व्यक्त

केली. यासोबतच या शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/punyaat-afternoon-torrential-rain-konkan-maratyathee-rains-thrust/

Related News