मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची
तब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती.
त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रात्रीच्यावेळी
Related News
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
सलाईन लावण्यात आले होते. आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा
खालावली. यावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या.
त्यांच्या टाहोमुळे वातावरण धीरगंभीर झाले. महिलांनी त्यांना
उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील त्यांच्या
मागणीवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा
मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस अगोदर 16 सप्टेंबरपासून
उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटून
गेले आहे. सरकारने त्यांना जी आश्वासनं दिली. त्यातील काहींची
अंमलबाजवणी झाली नाही. मुंबईच्या वेशीवर सरकारने
सगेसोयऱ्याचा अध्यादेश आणि ओबीसीमधून आरक्षणाची
अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या सहा महिन्यात
त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी
पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. आज त्यांची तब्येत खालावली.
अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची तब्येत घसरल्याने
महिलांसह आबालवृद्ध भावुक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी
उपोषण मागे घेण्यासाठी महिलांनी त्यांना विनंती केली. त्यांनी
यावेळी आक्रोश केला. महिलांना अश्रुधारा आवरता आल्या नाही.
जरांगे पाटील यांनी पाणी प्यावे अशी विनंती त्यांना करण्यात
आली. यावेळी काही महिला मंचावर आल्या. त्यांनी जरांगे पाटील
यांना पाणी पिण्याची विनंती केली. तर खालून पण मोठ्या संख्येने
आंदोलकांनी जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली.
Read also: https://ajinkyabharat.com/first-journalist-council-of-akshay-shinde-encounter-police/