“बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल
केले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून. त्यांनी कायदा हातात
घेतला नव्हता. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती. ज्याचं
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
एन्काऊंटर केलं तो आणि संस्था चालक असं मोठ सर्कल आहे.
एकाच आरोपीला अटक केली. आंदोलकांच्या घरात घुसून धिंड
काढली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले” असं संजय राऊत म्हणाले.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात ते बोलत होते. “एन्काऊंटर खरं
की, खोटं हे जनतेला माहित आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल
केले, ते आधी मागे घ्या. आरोपीच्या हाताता बेड्या आहेत.
आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे. तरी सुद्धा कल्याण जंक्शनला
आरोपी पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करतो. संडास साफ
करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला. त्याला तुरुंगात
असताना गोळ्या चालवायचं ट्रेनिंग यांनीच दिलं का?” अशी टीका
संजय राऊत यांनी केली. “संस्थाचालक फरार आहे. आपटे,
कोतवाल, आठवले यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले. का
गुन्हे दाखल केले? आम्ही सांगितलेलं का? तुम्ही गुन्हे दाखल केले,
त्यांना अटक का होत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी
विचारला. “माझ्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या आरोपीने
त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर
येऊ नये, म्हणून त्यांनी मुळापासून हे सर्व संपवलं” असा दावा
संजय राऊत यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/or-run-away-from-rain-orange-alert/