सोमवारपासून महाराष्ट्र राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला
आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले
Related News
अशोक वाटिका येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केलंय
- By Yash Pandit
अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत
- By Yash Pandit
अशोक वटीकेत विजयस्तंभाला मानवंदना, विविध कार्यक्रमांचे आयोजन
- By Yash Pandit
वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात उद्घाटन संपन्न…
- By Yash Pandit
नूतन वर्ष स्वागतासाठी मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
- By अजिंक्य भारत
रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स ys बसेस चे अज्ञात व्यक्तीने काच फोडले
- By Yash Pandit
अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील बाळापूर जवळ कत्तलीसाठी रेड्याची वाहतूक होत आहे
- By अजिंक्य भारत
अकोल्यातील उमरा येथे रंगला शंकर पट: १०१ बैलजोड्यांचा उत्साही सहभाग.
- By अजिंक्य भारत
अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू
- By अजिंक्य भारत
धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..
- By अजिंक्य भारत
शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न…
- By अजिंक्य भारत
एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल…
- By अजिंक्य भारत
आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले.
आज पासून पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह,
मुसळधार आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. आज पहाटे
मुंबई शहरात वीजांच्या कडकडाटीसह पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र
राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस
पडणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडणार. बंगालच्या उपसागरातील हवेचे कमी
दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस
पडणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलक्या ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून
येत आहे. राज्याच्या हवामानाची स्थिती पाहता हवामान विभागाने
काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीचा भाग
म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, बीड, परभणी,
नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर
उर्वरित भागांना आज यलो अलर्ट दिला आहे. आज पहाटे देखील
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटीसह पाऊस
झाला. सिंधुदुर्ग, अहमदनगर, रायगड, पुणे, सोलापूर, हिंगोली
आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस
आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाचा अंदाज आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/navra-majha-navsacha-2-chi-box-office-and-strong-earnings/