देशात अनेक ठिकाणी सातत्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण
होते. हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.
देशातील दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने
Related News
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
नदीजोड प्रकल्प हातात घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील अनेक
महत्वाच्या आणि मोठ्या नद्या एकमेकांना जोडून, दुशली भागात
त्यांचे पाणी वळवणे असा हा प्रकल्प आहे. दरम्यान आता याबाबत
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी भाष्य केले आहे.
भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर
करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी
उपलब्धता असावी यासाठी पुढील काही महिन्यांत देशातील २० नद्या
एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती
(जलसंसाधन) मंत्री सी. आर. पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले.
पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत
मुरवणे आवश्यक आहे. “हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची
भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले.
त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला. शुद्ध पाणी
घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी
झाला आहे, असे त्यांनी सांगितले. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती
मिळते आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे.
जगाच्या १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक
पाणी केवळ ४ टक्के उपलब्ध आहे. भविष्यात देशात पाण्याची पुरेशी उपलब्धता
असावी, यासाठी नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे.
त्यामुळे प्रत्येकाला पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल, अशा विश्वास पाटील
यांनी व्यक्त केला आहे.