श्रीलंकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली आहे. जेव्हीपी
अर्थात मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे नेते अनुरा
कुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अनुरा
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
दिसनायके हे डाव्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत. अनुरा दिसनायके हे
श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. सजित
प्रेमदासा यांचा पराभव केला आहे. 57 लाख 40 हजार 179 मतं
मिळवत अनुरा दिसनायके विजयी झाले आहेत. अनुरा दिसनायके
यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अनुरा कुमारा
दिसनायके हे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी
झाले. समगी जन बलवेगया पक्षाचे नेते सजित प्रेमदासा आणि
अनुरा दिसनायके या दोघांमध्ये काटें की टक्कर पाहायला
मिळाली. पहिल्या फेरीच्या अखेरपर्यंत एकालाही 50 टक्केंपेक्षा
जास्त मतं मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या फेरीची मतमोजणी
झाली. यात अनुरा दिसनायके यांचा विजय झाला. दिसानायके
यांना 42.31 टक्के मतं मिळाली तर प्रेमदासा यांना 32.8 टक्के
मतं मिळाली. या अटीतटीच्या लढतीत अनुरा दिसनायके यांचा
पराभव झाला. अनुरा दिसनायके हे ‘एकेडी’ नावाने परिचित
आहेत. मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे ते नेते आहेत.
तर नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे चे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार
होते. अनुरा दिसनायके हे डाव्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार
करतात. त्यामुळे कमी करांची मागणी त्यांचा पक्ष याआधीपासूनच
करत आला आहे. 2019 ला झालेल्या अध्यक्षपदाच्या
निवडणुकीत अनुरा दिसनायके यांना केवळ तीन टक्के मतं
मिळाली होती. यंदा मात्र त्यांनी जास्तीत जास्त मतं मिळवत
विजय प्राप्त केला.
Read also: https://ajinkyabharat.com/supreme-court-issues-verdict-on-child-pornography/