मूर्तिजापुरात आदेश बांदेकरांनी ‘खेळ मांडियेला’!
टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर परिचत व प्रसिद्ध
असलेले लाडके ‘भाऊजी आदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी
Related News
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी उत्साहात पार
पडला. या कार्यक्रमाचे आयोजन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी केले होते. खेळ, किस्से
आणि गप्पा गाणी अशी संगीतमय धमाल करीत महिलांसाठी पैठणीसह
अनेक बक्षिसांची लयलूट करणारा ‘खेळ मांडियेला हा कार्यक्रम येथील
लाल शाळा मैदानावर पार पडला. महिलांशी हसत खेळत किस्से आणि
गप्पांबरोबर विविध खेळ खेळत जिव्हाळ्याचे कौटुंबिक वातावरण निर्माण
झाले होते. या कार्यक्रमाला महिलांची न भुतो न भविष्यती अशी रेकॉर्ड ब्रेक
गर्दी उसळली होती. महिलांना वितरित केलेल्या कुपनच्या माध्यमातून
लकी ड्रॉ काढण्यात आला. यातून तीनशेच्यावर महिलांना खेळ खेळण्यासाठी
संधी मिळाली. धम्माल मस्ती बरोबरच सामूहिक फुगडी, नाच याचा मनमुराद
आनंद उपस्थित महिलांनी लुटला.
हजारो महिलांना बक्षिसांची लयलूट
या खेळांच्या माध्यमातून शेकडो महिलांनी भेटवस्तू पटकावल्या तर शेवटी
लक्ष्मी दिनेश गोडे यांना प्रथम बक्षीस जाहीर करण्यात आले. स्नेहा प्रवीण गावंडे
यांना द्वितीय तर दिपाली प्रशांत गावंडे यांनी तृतीय बक्षीस पटकावले. तीन
विजेत्या महिलांना भरजरी पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. सोबतच या
कार्यक्रमाला उपस्थित हजारो महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या प्रसंगी
तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी
मनोगत व्यक्त केले. तर आदेश बांदेकर यांनी गेली २० वर्षे आपण महाराष्ट्रभर
कार्यक्रमाचे सादरीकरण करत आलो त्यातील काही आठवणी व किस्सेही सांगितले.
हजारो महिलांचे एकाच वेळी नृत्य
आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडीयेला कार्यक्रमातील अनोख्या शैलीने महिलांचे
लक्ष वेधून घेतले. महिलांना नृत्य करण्याची संधी मिळताच त्यांचा आनंद गगनात
मावेनासा झाला. तब्बल 3000 महिलांनी एकाच वेळी नृत्य करण्याचा मनमुराद
आनंद लुटला.
Read also: https://ajinkyabharat.com/network-disappeared-from-the-morning-of-ganpati-visarjan-users-shocked/