मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये

आज

आज 76 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. त्यानिमित्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण छत्रपतीसंभाजीनगर

Related News

मधील सिद्धार्थ मैदानावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विधान

परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार भागवत कराड,

खासदार कल्याण काळे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा

मोठा बंदोबस्त तैनात आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी

मराठवाड्याच्या भरभराटीची कहाणी सांगितली. मराठवाडा मुक्ती

संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो,सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करून मराठवाड्याच्या समोर लागणार

दुष्काळग्रस्त हा शब्द दूर करायचं आहे. मराठवाडा ग्रीडला आम्ही

पुन्हा चालना दिली आहे. नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग आमच्या

काळात पूर्ण झालं. किर्लोस्कर- टाटासारख्या मोठ्या कंपनी मराठवाड्यात

आल्या आहेत, असं शिंदेंनी म्हटलं. लाडकी बहिण योजना, प्रशिक्षण

योजना यामुळे फायदा होत आहे. अन्नपूर्णा योजना दिल्या. पीकविमा दिला.

शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. मराठवाड्यातील अनेक कारखाण्याशी

आपण एम. ओ. यू साईन करतोय. एकीकडे विकास दुसरीकडे उद्योग

आणि कल्याणकारी योजनेची सांगड घालण्याचा प्रयत्न आहे. लाडकी बहिण

योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात पैशे पोहोचले

आहेत, असही ते यावेळी म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/punyaat-chandrakant-patils-escort-vehicle-accident/

Related News