CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा
कोलकाता ट्रेनी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात एक नवीन
अपडेट समोर आली आहे. आरोपी संदीप घोषच्या सीबीआय
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
कोठडीबाबत नवी माहिती मिळाली. पॉलीग्राफ टेस्टच्या CFSL
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, संदीप घोषने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर
तपास करणाऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
तपासादरम्यान संदीप घोषची एलव्हीए आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात
आली होती. CFSL नवी दिल्लीच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाशी
संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर संदीप घोषचं विधान दिशाभूल
करणारं आढळून आलं आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल
करण्याचा संदीप घोषचा विचार नव्हता अशी माहिती समोर आली आहे.
सकाळी ९.५८ वाजता माहिती मिळाल्यानंतरही तो महाविद्यालयात पोहोचला
नाही. संदीप घोषने हत्येबाबत तक्रार केलेली नाही. सुरुवातीला सर्वच जण
आत्महत्या केल्याचं म्हणत होते. वकिलाचा सल्ला घेऊनही संदीप घोषने
एफआयआर दाखल करण्याचा विचार केला नव्हता. सकाळी १० वाजल्या
पासून तो अभिजित मंडलच्या संपर्कात होता, परंतु त्याने बलात्काराची
घटना दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पुरावे नष्ट करण्यात आले. सीबीआयने
आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटलं आहे की, अभिजीत मंडलने संजय रॉय
आणि इतरांच्या स्क्रीनिंगमध्ये अन्य संभाव्य आरोपींसोबत गुन्हेगारी कट
रचला आणि तपासाची दिशा वळवण्याचा प्रयत्न केला. सीबीआयचे म्हणणं
आहे की आरोपींनी जाणूनबुजून अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आणि
जाणूनबुजून खोटी तथ्ये नोंदवली. रुग्णालय प्रशासनासोबत मिळून हे सर्व
करण्यात आलं. तसेच अशा प्रकारे आरोपी संजय रॉयला वाचवण्याचा देखील
प्रयत्न करण्यात आला. आरजी कर रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी
डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी संजय रॉयला
अटक करण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ladencha-mulga-hamza-is-still-alive/