ब्रिटनमधील ‘मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने एका गुप्तचर अहवालाचा
हवाला देत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा
हमजा बिन लादेन जिवंत असल्याचा दावा केला आहे. हमजा
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे नेटवर्क उभारण्यात गुंतला आहे.
यापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेने दावा केला होता की, हमजाचा हवाई
हल्ल्यात मृत्यू झाला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प यांनीही 14 सप्टेंबर 2019 रोजी याची पुष्टी केली होती. मिररच्या
वृत्तात म्हटले आहे की, हमजा आणि त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन
अफगाणिस्तानमध्ये गुप्तपणे अल कायदाचे नेटवर्क चालवत आहे.
तालिबानविरोधी लष्करी संघटना नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट
(एनएमएफ) च्या अहवालाचा हवाला देत मिररने हा दावा केला
आहे. एनएमएफने आपल्या अहवालात हमजा आणि त्याच्या साथीदारांची
माहिती दिली आहे. मिररच्या वृत्तानुसार, अल कायदाने अफगाणिस्तान
मध्ये 10 प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. इथे तो पाश्चिमात्य देशांचा
द्वेष करणाऱ्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशीही हातमिळवणी करत
आहे. अल कायदाचा म्होरक्या हमजा आपला बहुतांश वेळ काबूलपासून
100 किमी दूर असलेल्या जलालाबादमध्ये घालवतो. रिपोर्टनुसार,
34 वर्षीय हमजाचे तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत.
तालिबानी नेते त्याला वेळोवेळी भेटत असतात. रिपोर्टनुसार, तालिबान
हमजाच्या कुटुंबाला सुरक्षाही पुरवत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/narhari-jhirwal-yamcha-dhangar-reservation-protest/