पुढील ४ दिवसात महाराष्ट्रासह इतर राज्यात पावसाचा अंदाज

पावसाअभावी

पावसाअभावी देशातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती.

त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाची इच्छा लवकरच पूर्ण

होणार आहे. येत्या 4 दिवसात राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल

Related News

असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 20 सप्टेंबरपर्यंत

पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रासहीत छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर,

मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याशिवाय, काही राज्यात

मुसळधार पावसाचा अंजा वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या

लगत असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

त्यात झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि ईशान्येकडील

अनेक भागांचा समावेश आहे. तिथे येत्या 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार

पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर तयार

झालेला खोलदाब हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. सोमवारी याचे

रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे देशातील काही

भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा

तयार झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होईल. मात्र, हा पाऊस सौम्य

स्वरूपाचा असेल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरातही ढगाळ

वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी कोसळणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/announcement-made-by-maratha-agitating-chief-minister-advat/

Related News