जम्मू-काश्मीर: पीएम मोदींचा दौरा असतानाच दहशतवाद्यांमध्ये चकमक

दोन

दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी दोन ठिकाणी

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये

Related News

तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काल किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद

झाले होते. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि

पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील

चक टापर भागात शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही

चकमक सुरू झाली. रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली. आज

सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची अद्याप ओळख

पटलेली नाही. किश्तवाडच्या चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी

साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांच्या

उपस्थितीची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान चकमक

सुरू झाली. नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग अशी

शहीद जवानांची नावे आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/congress-mla-jhuber-khan-investigation-death/

Related News