आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये
आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानं
सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांना सडेतोड
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
उत्तरं देत आहेत. पण, अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या एका
वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीकेची तोफ डागली जात आहे. मात्र, सत्ताधारी
महायुतीची पुरती गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा
समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त
हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं नितेश राणे म्हणाले
आहेत. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना त्यांनी खालच्या भाषेत
टीका केली आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी संताप
व्यक्त केला आहे. एखाद्या समाजघटकाविरोधातली वक्तव्य खपवून घेणार नाही,
असं अजित पवार म्हणाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनंही नितेश राणे यांच्यावर
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नितेश राणेंना खतपाणी
घालून जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र भाजपनं केल्याचं ठाकरेंच्या शिवनसेनेचे
नेते शरद कोळी म्हणाले आहेत. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव
मानू नका, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना नितेश राणे खालच्या भाषेत टीका
केली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांसोबतच त्यांच्या मित्रपक्षांकडूनही त्यांच्यावर
टीकेची झोड उठवली आहे.