दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त!

पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा

ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम

पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या

Related News

मार्गाचा उद्धाटन करण्यात आले. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे

हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार होणार आहे. दक्षिण मुंबईपासून

वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, वेगवान प्रवास आता या

रस्त्यामुळे शक्य होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट

झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून

सुटका होणार आहे. आता या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ

शिंदेंनी जनतेशी संवाद साधला. “आपण कोस्टल हायवे सुरु केलेला

आहे. आता तर तो सिलिंकलाही जोडला आहे. यामुळे आता मरीन

ड्राईव्ह ते बांद्रापर्यंतचे अंतर अवघ्या दहा मिनिटात मुंबईकरांना गाठता

येणार आहे. यामुळे मुंबईकरांना अतिशय सुखकर आणि जलद प्रवास

करण्याची संधी मिळेल. लोकांचा वेळ, इंधन वाचेल. तसेच प्रदूषणही

कमी होईल. लोक घरी व कार्यालयात वेळेत किंवा लवकर पोहोचतील

आणि घरी जास्त वेळ ही देऊ शकतील. मुंबईसाठी हा गेम चेंजर प्रकल्प

आहे. त्यानंतर हा रोड पुढे वर्सोव्याला जोडला जाईल आणि त्यानंतर वर्सोवा

ते विरार हा प्रकल्प देखील आम्ही पुढे नेत आहोत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/traffic-disrupted-in-some-areas-of-delhi-due-to-rain/

Related News