अकोला जिल्ह्यातील विदर्भ राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघ
नागपूर यांच्यावतीने आज अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर
मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले,
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
येणाऱ्या काळात सदर कर्मचाऱ्याच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास
13 सप्टेंबर पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे
आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी कर्मचारी दिला आहे.
अकोला जिल्यातील मंडळ अधिकारी सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या
गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे प्रलंबीत आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून
विविध आंदोलन करून सुद्धा शासन या बाबत ठोस निर्णय घेत नसल्याने
कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, जिल्यातील मंडळ अधिकारी
संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास
सहन करावा लागत आहे, शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत निर्णय घ्यावा
या करिता दिनांक 6 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले,
दिनांक 9 सप्टेंबर रोजी संबंधित तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन
करण्यात आले, या पश्चात आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय
समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले, या पश्चात
शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा विचार न केल्यास मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या
वतीने विभागीय आयुक्त कार्यालय समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे,
शासनाने मंडळ अधिकारी संवर्गाचे मासिक वेतन शासन निर्णयाप्रमाणे दरमहा पाच
तारखेच्या आत करावे तसेच नायक तहसीलदार संवर्गामध्ये होणाऱ्या पदोन्नतीसाठी
मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांचे पदसंख्येचा आढावा घेऊन मंडळ अधिकारी
व अव्वल कारकून पदोन्नतीचे प्रमाण त्वरित निश्चित करावे या मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांनी
रेटून धरल्या होत्या.
Read also: https://ajinkyabharat.com/saffron-mavyache-modak-made-for-bappa/