दुबईच्या राजकुमारीने लॉन्च केला Divorce नावाचा परफ्युम!

संयुक्त

संयुक्त अरब आमिरातचे पंतप्रधान तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मद

बिन राशिद अल मकतूम यांची कन्या आणि दुबईची राजकुमारी शेखा महरा

मोहम्मद रशीद अल मकतूम ही नेहमीच चर्चेत असते. राजकुमारी शेखा

Related News

महरा ही तिच्या मुक्त  विचारांमुळे, व्यवसाय, सामाजिक कार्य, लग्नामुळे चर्चेत

राहिली. आता तिच्या डीवॉर्समुळे चर्चेत असतानाच तिने एक नवा परफ्युम

लॉन्च केलाय त्यामुळे ती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. जुलै महिन्यात

राजकुमारी शेखा महरा हिने इन्स्टाग्रावर पती शेख माना बिन मोहम्मद बिन

रशीद बिन माना अल मकतूम याला सार्वजनिकरित्या घटस्फोट दिला होता.

आता तिने एक नवा परफ्युम लॉन्च केलाय. त्याला डीवॉर्स असं नाव दिलं आहे.

शेखा महराने ज्या प्रकारे तिचा घटस्फोट जाहीर केला ते एक धाडसी पाऊल

मानलं जातं आहे. तलाक, तलाक, तलाक म्हणत राजकुमारीने पतीबरोबरचे

संबंध तोडले होते. त्यानंतर दोघेही भूतकाळ विसरून गेले असतील असं वाटत

असतानाच शेखा महराने डायवॉर्स नावाचा परफ्युम लॉन्च केल्याने अनेक जण

आश्चर्यचकीत झाले आहेत. गेल्यावर्षी 27 मे 2023 रोजी शेख माना बिन मोहम्मद

बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी राजकुमारी शेखा महारा हिचे लग्न

झाले होते. लग्नानंतर पाच महिन्यांनी त्यांनी गुड न्यूज दिली. शेख महरा हिने सोनोग्राफीचा

फोटो स्टोरीवर शेअर करत त्यांनी ही बातमी जगाला दिली होती. पण मुलीचा जन्म होताच

दोन महिन्यांनी शेखा महरा हिने पतीला घटस्फोट जाहीर केला. त्यानंतर या परफ्युममुळे

ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/maldivian-president-muizhu-to-visit-india-soon/

Related News