‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ चा सुधारित शासन निर्णय निघाला

महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून

त्यासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व धर्मियांमधील

ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना

Related News

भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ

दर्शन योजना सुरु करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने

सादर केलेल्या प्रस्तावास 11 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये

मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन

योजना” सुरु करण्यास 14 जुलै, 2024 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात

आली आहे. मात्र, आता शासनाने नवीन शासन निर्णय जारी करत या योजनेच्या

प्रक्रियेतील सुधारीत निकष जाहीर केले आहे. त्यामुळे, अर्जदारांना सुधारित

निकषानुसारच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

राज्य शासनाने 11 ऑगस्ट रोजी नवीन शासन निर्णय काढून या योजनेसाठी

निषक जारी केले आहेत. तत्पूर्वी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी 31 जुलै,2024

व 05 ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून 14 जुलै 2024

च्या शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब

शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’

या योजनेच्या 14 जुलै,2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करण्याचा

निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अर्ज करण्याची प्रक्रिया, सुधारित निकष आणि लाभार्थ्यांची

निवड याची माहिती देण्यात आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/republican-bahujan-vidyarthi-parishad-aggressive-against-vidyapathachya-bhongal-karbhaara/

Related News