सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस पडत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने
पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील
सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. IMD ने तीव्र गडचिरोलीसह
आजूबाजूच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता.
त्यानंतर आता यलो अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली
जिल्ह्यात पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील ४८ तासाकरिता
येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार
पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता
असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी केले आहे.
हवामान विभागाने १० व ११ सप्टेंबर रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तू, विद्युत खांब किंवा झाडाजवळ राहू नये,
झाडाखाली आसरा घेऊ नये. मुसळधार, अति मुसळधार पावसामुळे नदी, नाले,
ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदी किनाऱ्यावरील गावांतील
नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी,नाल्याच्या
पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये.
तलाव, बंधारा, नदी आदी ठिकाणी नागरिकांनी पर्यटनासाठी जाणे टाळावे
व धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह करू नये, असे आवाहनही जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-heads-various-committees-in-action-mode/