नाशिक येथील शिंदे गावात असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला
भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात
असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. पोलीस
Related News
देशाच्या जडण घडणीत विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे :- अजित कुंभार
- By Yash Pandit
बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या
- By Yash Pandit
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती
- By Yash Pandit
ठाणेदार दिपक वारे यांची सिद्धेश्वर विद्यालय हातोला येथे भेट
- By Yash Pandit
शिवपुर येथील एकाच दिवशी दोन सख्या भावाचा मृत्यू
- By Yash Pandit
अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांचा किरकोळ वाद
- By Yash Pandit
अकोल्यातील पिंजर येथील एका बारमध्ये दारू उधार न दिल्याने घडलेली
- By Yash Pandit
गजानन हरणे यांची राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
- By Yash Pandit
नाफेडच्या विरोधात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन !
- By Yash Pandit
श्री नारायण बहुउद्देशीय संस्था “संविधानाचा जागर” उपक्रम राबविणार! प्रजासत्ताक दिनी उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा
- By Yash Pandit
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
- By yash desk
अकोला: रामदासपेठ पोलिसांची धडक कार्यवाही, १० गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक करताना आरोपी अटक
- By Yash Pandit
आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्याच्या
गोडाऊनला एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.
गोडाऊनमध्ये असलेले फटके एकामागे एक फुटत असल्याने परिसरात
मोठमोठे आवाज येत आहे. तर धुराचे लोट आकाशामध्ये पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
फटाक्यांचा एक ट्रक गोडाऊनच्या परिसरात आला आणि त्यानंतर काही वेळाने आग
लागल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे
कारण अद्याप अस्पष्ट आहे. गोडाऊनमध्ये कोणी अडकले आहेत का?
याबाबतही अद्याप स्पष्टता नसून पोलीस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचारी
घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.