राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज
जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे
यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली.
मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण
करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे
17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या
आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे
पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा
निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी
महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी
आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब
दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता.
मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार
उभे करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे
घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे पाटील
हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात. तसे घडल्यास यावर
भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
Read also: https://ajinkyabharat.com/ramayanat-ranbir-kapoor-sakarnar-role-of-prabhu-ram-and-parshuram/