बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर पुन्हा एकदा सिनेप्रेमींना
चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता
रणबीर नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट ‘रामायण’मध्ये
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
भगवान राम आणि परशुराम यांची भूमिका साकारणार आहे. ही दुहेरी
भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरू शकते.
रामायणाच्या कथेत प्रभू राम आणि परशुराम यांच्यातील एक संक्षिप्त पण
महत्त्वाचा सामना आहे. जेव्हा भगवान राम शिवाचे धनुष्य तोडतो तेव्हा
परशुराम चिडतात आणि रामाला विष्णूला नमन करण्याचे आव्हान देतो.
जेव्हा राम हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करतात, तेव्हा परशुराम विष्णूचा
अवतार म्हणून तपश्चर्ये करायला लागतात. परशुरामचे पात्र लहान असले तरी
रामायणात त्याचे महत्त्व मोठे आहे.रणबीर कपूर ‘रामायण’मध्ये दुहेरी भूमिकेत
दिसणार आहे. चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,
“रणबीर कपूर परशुरामच्या रूपात पूर्णपणे वेगळा आणि न ओळखता येणारा दिसणार आहे.”
रणबीरच्या दुहेरी भूमिकेरणबीरच्या दुहेरी भूमिकेच्या बातमीने चित्रपट रसिकांमध्ये
मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आता या दिग्गज महाकाव्याचे हे अनोखे चित्रण
प्रेक्षक कसे स्वीकारतील हे पाहावे लागेल. रणबीर कपूर शेवटचा ॲनिमल या
चित्रपटात दिसला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
Read also: https://ajinkyabharat.com/cpim-secretary-sitaram-yechurys-health-is-worrying/