सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक

माकपचे

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती

चिंताजनक आहे. त्यांना नवी दिल्ली येथील ऑल इंडिया

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे  कृत्रिम श्वासोच्छवासावर

Related News

ठेवण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी ही

माहिती दिली. सीतारामन येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी छातीत संसर्ग

झाल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने

त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. त्यांच्या पक्षाच्या म्हणण्यानुसार,

डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

त्यांच्या पक्षाने मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, ७२ वर्षीय

येचुरी यांच्यावर एम्सच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) श्वसनमार्गाच्या

तीव्र संसर्गावर उपचार सुरू आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/prime-ministers-74th-birthday-from-17th-september-bjp-will-organize-service-in-pandharwada/

Related News