वंदे भारत चे इंजिन फेल! अखेर मालगाडीचे इंजिन आले कामी!

भारतात

भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ट्रेन म्हणून वंदे भारत

ट्रेनची ओळख झाली आहे. यामुळे ही ट्रेन आपआपल्या

भागातून सुरु करण्याची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाने

Related News

बनवण्यात आलेले वंदे भारत ट्रेनचे इंजिन फेल झाल्याची घटना

घडली. त्यानंतर मालगाडीचे इंजिन लावून वंदे भारत ट्रेनला नेण्यात आले.

त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली ते बनारस जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या इंजिनामध्ये बिघाड

निर्माण झाला. इटावामधील भरनथा रेल्वे स्टेशनवर ही ट्रेन थांबली.

त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी

दाखल झाले. परंतु त्यांना ट्रेनमधील बिघाड दूर करता आला नाही. या ट्रेनमध्ये

750 प्रवाशी होते. त्यात अनेक राजकीय नेतेही होते. ट्रेमधील प्रवाशांनी गोंधळ

सुरु केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्या जाणारी

वंदे भारत एक्स्प्रेस थांबवून प्रवाशांना त्या गाड्यांमध्ये बसवण्यात आले.

वंदे भारत ट्रेन बराच वेळ भरनथा येथे पडून होती. अखेर तिला नेण्यासाठी

मालगाडीचे इंजिन बोलवण्यात आले. त्यानंतर ती गाडी नेण्यात आली.

सोशल मीडियावर वंदे भारतला मालगाडीचे इंजिन नेत असल्याचा व्हिडिओ

व्हायरल झाला आहे. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/harbor-railway-in-mumbai-dismantled/

Related News