नागपूर विभागात जिल्हा प्रथम
गोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्या
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
या सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज,
( दि. ६) गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात २ लाख ८५ हजार घरकुलांच्या
उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत प्रधानमं
त्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष २०२२-२३) प्रभावी अंमलबजावणी करणारे
जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात
आयोजित कार्यक्रमात बिदरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभघाटे,
नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी,
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे,
आस्थापना उपायुक्त विवेक इलमे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील
सरपंच, पंचायत समिती सभापती, तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी बिदरी यांनी,
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील
सहा जिल्ह्यांसाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल उभारण्यात आली.
उर्वरित १२ हजार घरकुलांचे उद्दिष्टयही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
Read Also https://ajinkyabharat.com/welcome-bananas-by-throwing-garbage-in-trash-cart/