कचरा गाडी येताच हार टाकून केले स्वागत

धामणगाव रेल्वे, दि. 8 प्रतिनिधी : पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत जुना धामणगाव

रेल्वे येथील केर कचऱ्याची गाडी गेल्या १२ते१५ दिवसापासून कृष्णा नगर व इतर ठिकाणी आली नव्हती.

त्यामुळे कचऱ्याची गाडी येताच नागरिकांनी गाडीचे हार टाकून स्वागत केले.
कृष्णा नगर व बाकी परिसरातील कचऱ्याची गाडी आलेली नाही तरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने या केर कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यात येत नसून

सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. तरी ग्रामपंचायत जुना धामणगाव रेल्वे येथील कचऱ्याच्या गाडीचे दिनांक सहा सप्टेंबर २४ रोजी कृष्णा

नगर येथील काही नागरिकांनी केर कचऱ्याच्या गाडीचे हार टाकून स्वागत केले. १२ते१५ दिवसांपासून जर कचऱ्याची गाडी येत नसेल तर

सामान्य नागरिकांना कचरा कुठे टाकावा ? याकडे ग्रामपंचायत कार्यालय जुना धामणगाव रेल्वे, सरपंच व वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का?

 

Read Also  https://ajinkyabharat.com/sutka-of-15-cattle-going-for-slaughter/