पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का!

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा भाजपला रामराम 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात

अनेक बदल घडून आले असताना गोंदियाचे माजी आमदार

Related News

गोपालदास अग्रवाल यांनी आपण भाजपाच्या प्राथमिक

सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून कॉंग्रेस पक्षात घरवापसी

करीत असल्याचे आज, (दि. ८) पत्रकार परिषदेतून जाहिर केले आहे.

गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसकडून २ वेळा विधानपरिषद तर ३

वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र २०१९ च्या

विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत महसूल मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचा हात सोडत

भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दोन महिन्यांत दुसरा मोठा धक्का

दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

त्यानंतर पुन्हा आता माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी

भाजपला सोडचिट्टी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला दोन महिन्यांत

दुसरा मोठा धक्का बसला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/new-song-displayed-in-the-background-of-ajit-pavaranch-assembly-elections/

Related News