महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे
मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला
यश आले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी
केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने
धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत
सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने
खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री
शिवराजसिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत
आले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती,
तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता.
अखेर या मागणीला मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारने
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान
आधारभूत किंमत ही 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल इतकी
निश्चित केली असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री
शिवराज सिंह चौहान यांसह वेळोवेळी पाठपुरावा केला.
सोबतच या मागणीला समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा
पवार यांचे देखील मंत्री मुंडे यांनी यावेळी आभार व्यक्त केलेत.
Read also: https://ajinkyabharat.com/this-election-is-the-future-of-baramathikaranya-ajit-pawar/