महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका दिवाळी नंतर!

मुख्यमंत्र्यांनी

मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत!

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकांचे बिगूल दिवाळीनंतर वाजण्याचे संकेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा

Related News

निवडणूका होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. हरियाणा, जम्मू-काश्मीर

मधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सार्‍यांचे लक्ष

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांकडे लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमामध्ये बोलताना,”येत्या दोन महिन्यात अर्थात

नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील असे वक्तव्य केले. यावेळी एकनाथ शिंदे

यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून द्या, असे आवाहनही

केले आहे.” चांदिवली मध्ये मिठी नदीच्या बाजूला आणि विमानतळ प्राधिकरणाच्या

जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल

संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. या घरांच्या चाव्या वाटपाचा

कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बोलताना एकनाथ

शिंदेंनी निवडणुकांबद्दल वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूकांनंतर

आता विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सारेच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.

महायुती आणि महा विकास आघाडी कडून सर्व्हे करुन आता जागावाटपाचा आढावा घेतला

जात आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता

विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-to-launch-campaign-in-jammu-and-kashmir-assembly-elections-today/

Related News