सरकारने शेतकरी पण ‘लाडका’ आहे हे दाखवून द्यावं -राज ठाकरे

मराठवाडा

मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे

मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक

आडवे झालेले पहायला मिळाले आहे. यामुळे शेत करण्यांना मोठे

Related News

नुकसान झालेले पहायला मिळत आहे.  मराठवाड्याला सलग तिसऱ्या

दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन

हाहाकार उडाला. नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला. अनेक घरांमध्ये

पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेकडो गावांचा संपर्क तुटला.

पिकांचाही चिखल झाला. शेतकऱ्यांना या नुकसानाची भरपाई लवकरा लवकर

मिळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या X पोस्ट द्वारे केली आहे.

राज ठाकरेंनी आपल्या X पोस्टमध्ये लिहले आहे की “गेल्या काही दिवसांत

मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप

नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून

गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील

सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या

नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता

येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.”

सरकारने मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या

असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून

नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं. असे देखील आपल्या

पोस्टमधून राज ठाकरे यांनी लिहले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/high-court-for-kangana-ranauts-emergency/

Related News